मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

mumbai
mumbai sakal
Updated on
Summary

मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी ई-मेलवरून आली आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी ई-मेलवरून आली आहे. परीक्षेच्या निकालाचं कामकाज सुरु असतानाच ही धमकी आली असून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. निकाल लवकर लागले नाहीत तर विद्यापीठ उद्ध्वस्त करू अशी धमकी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या ईमेल आयडीवरून मार्च २०२१ चे परीक्षेचे निकालाचे कामकाज सुरू असताना हे धमकीचे मेल आल्याचं सांगितलं जातं आहे.

विशेष म्हणजे धमकीत ही आरोपींनी BSC, B.com, BA, यांचे 6 सेमिस्टरचे निकाल 6 च्या आत नाही लागले तर बाँम्बस्फोटाची चित्रे पाठवून विद्यापीठ उद्धवस्त करू अशी धमकी दिली होती. विद्यापीठातील डाँक्टर हे आलेले मेल तपासत असताना 9 जुलै व 10 जुलै रोजी दोन स्वतंत्र ईमेल आयडीहून ही धमकी आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

mumbai
मागण्या पूर्ण करा, नाहीतर...; मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला धमकी

धमकी देण्यात आलेले दोन मेल आयडी समोर आले आहेत. dboee@exam.mu.ac.in व coe4you@exam.mu.ac.in या दोन ईमेल आयडीहून ओळख लपवत आरोपींनी धमकी दिली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com