प्राध्यापकांसमोर भलत्याच विषयाची उत्तरपत्रिका 

नेत्वा धुरी
रविवार, 9 जुलै 2017

उत्तरपत्रिका तपासण्यास गती 
शुक्रवारी दोन हजार 700 प्राध्यापकांनी 48 हजार उत्तरपत्रिका तपासल्या. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 70 हजार उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. साडेचार हजार प्राध्यापक "सेल्फ फायनान्स' विषयाची उत्तरपत्रिका तपासण्यात गुंतले आहेत. बीएमएस, बीएमएम, बीएफए आदींच्या दोन लाख उत्तरपत्रिका, वाणिज्य शाखेच्या सहा लाख उत्तरपत्रिका प्राधान्यक्रमाने तपासल्या जात आहेत. त्यामुळे या विषयांचा निकाल सर्वांत आधी लागण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - मुंबई विद्यापीठातील ऑनस्क्रीन असेसमेंट प्रक्रियेला दिरंगाई करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तरपत्रिका तपासायला आलेल्या प्राध्यापकांना संबंधित विषयांऐवजी भलतीच उत्तरपत्रिका संगणकावर आल्याने प्राध्यापक चांगलेच वैतागले आहेत. 

एकामागोमाग उत्तरपत्रिका तपासताना कित्येकदा सर्व्हर हॅंग होत असल्याने प्राध्यापक वैतागले होते. त्यात प्रश्‍नपत्रिका कोड देण्यात वरिष्ठ पातळीवर चूक झाल्याने प्राध्यापकांना आपल्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासायला मिळाल्याच नाहीत. परिणामी, संपूर्ण जूनमध्ये पेपरतपासणीसाठी आलेल्या प्राध्यापकांचा वेळ फुकट गेला. याचा परिणाम प्राध्यापकांच्या हजेरीवर झाला आहे. 

संगणकाच्या स्क्रीनवर कित्येकदा विषयाशी संबंधित नसलेली उत्तरपत्रिका आल्याचा अनुभव प्राध्यापकांना सतत येत असल्याची तक्रार आहे. दरम्यान, राज्यपालांच्या हस्तक्षेपानंतर या तक्रारींचे गांभीर्य विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आले.

पेपरतपासणीतील दिरंगाईचे कारण स्पष्ट झाल्यानंतर चार दिवसांत हा तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम विद्यापीठात युद्धपातळीवर सुरू होते. या दिवसांत परीक्षा विभागासह कुलगुरूंनीही उत्तरपत्रिका तपासणीत लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी (ता. 7) मध्यरात्री एक वाजेपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीचा मागोवा घेत ते कार्यालयातच बसले होते. 

उन्हाळी सुटीतच काही प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासायला घेतल्या, त्या वेळी भलत्याच उत्तरपत्रिका संगणकावर येत असताना दिसल्या; मात्र उत्तरपत्रिका संचावर चुकीचा प्रश्‍नसंच (क्वेश्‍चन कोड) टाकल्याने हा प्रकार मोठ्या प्रमाणात कालांतराने दिसून आला. ही तांत्रिक बाब दुरुस्त केल्यानंतर आता शुक्रवारपासून प्राध्यापकांना पेपरतपासणीत अडथळे येत नसल्याचे समजते. 

उत्तरपत्रिका तपासण्यास गती 
शुक्रवारी दोन हजार 700 प्राध्यापकांनी 48 हजार उत्तरपत्रिका तपासल्या. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 70 हजार उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. साडेचार हजार प्राध्यापक "सेल्फ फायनान्स' विषयाची उत्तरपत्रिका तपासण्यात गुंतले आहेत. बीएमएस, बीएमएम, बीएफए आदींच्या दोन लाख उत्तरपत्रिका, वाणिज्य शाखेच्या सहा लाख उत्तरपत्रिका प्राधान्यक्रमाने तपासल्या जात आहेत. त्यामुळे या विषयांचा निकाल सर्वांत आधी लागण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Mumbai University question paper issue