
परीक्षा, निकाल आणि वसतीगृहातील विविध समस्यांवरून कायमच चर्चेत राहणाऱ्या मुंबई विद्यापीठाची रविवारी, २७ जुलै रोजी सर्वसाधारण सिनेट बैठक (अधिसभा बैठक) होणार आहे. मागील बैठकीत युवासेवा आणि प्राध्यापक आदी संघटनांनी उपस्थित केलेल्या असंख्य प्रश्नांना अद्यापही विद्यापीठ प्रश्नांनी उत्तरे दिले नसल्याने ही सिनेट सभा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.