Mumbai Crime : 5 वर्षीय मुलावर 2 अल्पवयीन मुलांकडून अनैसर्गिक अत्याचार

मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात सोमवारी 5 वर्षांच्या मुलावर 2 अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला.
Child Sexual Abuse News
Child Sexual Abuse Newsesakal
Summary

मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात सोमवारी 5 वर्षांच्या मुलावर 2 अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला.

मुंबई - मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात सोमवारी 5 वर्षांच्या मुलावर 2 अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी 16 व 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. एमआयडीसी पोलीस दोन्ही आरोपींचा शोध सध्या घेत आहेत.

मुंबईतील अंधेरी पूर्व भागात सोमवारी 13 मार्चला सायंकाळी हा प्रकार घडला. पीडित मुलाची आई त्याच्या मोठ्या भावाला शाळेतून आणण्यासाठी गेली होती. यावेळी मुलाच्या आईने पीडित मुलाला घरी ठेवले होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या 15 व 16 वर्षांच्या अल्पवयीन आरोपींनी पीडित मुलगा एकटाच असल्याचे पाहून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

Child Sexual Abuse News
Mumbai Fraud : व्यावसायिकाची व्हिडीओ कॉल द्वारे फसवणूक करून ब्लॅकमेल

तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास परिसरात बदनामी करण्याची धमकी दिली आणि तेथून पसार झाले.त्यामुळे घाबरलेल्या मुलाने आई घरी आल्यावर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com