Mumbai Fraud : व्यावसायिकाची व्हिडीओ कॉल द्वारे फसवणूक करून ब्लॅकमेल

अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून परळ येथील व्यावसायिकाकडून सुमारे चार लाख रुपये खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
Blackmailing video call
Blackmailing video callsakal
Summary

अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून परळ येथील व्यावसायिकाकडून सुमारे चार लाख रुपये खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

मुंबई - अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून परळ येथील व्यावसायिकाकडून सुमारे चार लाख रुपये खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी चार मोबाइल धारकांविरोधात मंगळवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडिओ कॉलद्वारे फसवणूक

परळ येथे वास्तव्यास असलेल्या 40 वर्षीय तक्रारदाराचा हार्डवेअर वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. पिडीत व्यक्तीला 7 मार्च रोजी घरी असताना एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. व्हिडिओ रिसिव्ह केल्यानंतर समोरील महिला अश्लील चाळे करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे व्यावसायिकाने त्या महिलेचा व्हिडीओ कॉल तात्काळ बंद केला. त्यानंतर व्यावसायिकाला एक संदेश आला. त्यात एक चित्रफीत पाठवण्यात आली होती.

Blackmailing video call
Mumbai Crime : वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण; Video होतोय Viral

पिडीत व्यक्ती महिलेचे अश्लील चाळे पाहत असल्याचे चित्रीकरण त्यात करण्यात आले होते. ती चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन तक्रारदारांकडे 13 हजार 500 रुपयांची खंडणी मागण्यात आली. भीतीपोटी तक्रारदारांनी ती रक्कम आरोपी महिलेला पाठवली. त्यानंतर वारंवार पैशांची मागणी होऊ लागली. त्यामुळे पिडीत व्यक्तीने महिलेचा फोन नंबर ब्लॉक केला.

तोतया सीबीआय अधिकारी

सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या राम पांडे नावाच्या व्यक्तीचा त्यांना फोन आला. यूट्यूबवर तक्रारदारांचे अश्लील चित्रीकरण पाहिले असून त्याबाबत तक्रार आली असल्याचे कथित सीबीआयच्या अधिकाऱ्याने फोनवर सांगितले. तसेच ते चित्रीकरण यूट्यूबवरून काढण्यासाठी व्यावसायिकाकडे पैशांची मागणी करण्यात आली.

Blackmailing video call
Kalyan Dombivali Municipal : डोंबिवलीत त्या ठिकाणी पाणी चोरी नाही; पालिकेचा खुलासा

तसेच यूट्यूबच्या हेल्पलाईनच्या नावाने फसवणूक करत तक्रारदाराकडून रक्कम घेण्यात आली. त्यानंतर राम पांडे नावाच्या व्यक्तीने चित्रीकरण झालेल्या तरुणीने आत्महत्या केल्याचे सांगून व्यावसायिकाकडे पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी आपली फसवणूक होत असल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी भोईवाडा पोलिसांकडे तक्रार केली. भोईवाडा पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com