Dry Fish: यंदा मे महिन्याच्या अखेरीसच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ताज्या माशांची आवक घटली असून परिणामी ग्राहकांनी सुक्या मच्छीला पसंती दिली आहे.
ठाणे (बातमीदार) : यंदा मे महिन्याच्या अखेरीसच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परिणामी पावसाळ्यापूर्वीच सुकी बोंबील, मांदेली, माखली, करंदी यांची खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे.