

Gas Cylinders Shortage
ESakal
- नितीन बिनेकर
मुंबई - इराण-अमेरिका-इस्त्रायल तणावामुळे खाडी भागात निर्माण झालेल्या अस्थिरतेचे पडसाद जगभर उमटत असताना मुंबईतही व्यावसायिक गॅस टंचाईची भीती व्यक्त केली जात होती. गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यास मुंबईतील हॉटेल व्यवसाय डगमगेल आणि त्यात काम करणारे हजारो परप्रांतीय कामगार गावाकडे परततील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या ताज्या आकडेवारीने हा अंदाज फोल ठरल्याचे दिसत आहे. उलट प्रवाशांच्या संख्येत सुमारे दीड टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.