मुंबईला उरण तालुक्यातील मोरा बंदराशी जोडणारी दुसरी रो-रो (रोल ऑन-रोल ऑफ) सेवा एप्रिल २०२६ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली..७५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला गेल्या चार-पाच महिन्यांपासून वेग आला आहे. २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प तांत्रिक अडचणी, निविदा प्रक्रिया, हवामान आणि मोजमापांच्या समस्यांमुळे रखडला होता. मात्र आता प्रकल्पाच्या कामाचा सुमारे ५० टक्के भाग पूर्ण झाला आहे..रो-रो सेवा म्हणजे काय?ही जहाजाद्वारे मालवाहतूक करण्याची पद्धत आहे. यात गाड्या, एसयूव्ही, मोटारसायकल यांसारखी अवजड यंत्रसामग्री थेट जहाजावर चालवून नेली आणि उतरवली जाते. क्रेनने उचलण्याची गरज नसते, त्यामुळे मालवाहतूक जलद, सुरक्षित आणि कमी खर्चिक होते. मालाला नुकसान होण्याचा धोकाही नसतो..Mumbai News: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! ७ जिल्ह्यांत ६५ वसतिगृहे उभारली; पण कुठे? जाणून घ्या ठिकाणांची नावे....सर्वात मोठी अडचणया मार्गावरील सर्वात मोठी अडचण रेवस जेट्टीचे बांधकाम ठरले आहे. जेट्टीच्या खोलीत वाढ, सुरक्षाविषयक सुधारणा आणि डिझाइनमधील बदलांमुळे खर्चात सुमारे ५ कोटी रुपयांची भर पडली आहे. जेट्टीचे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार असल्याचे सांगितले जात आहे..रायगड परिसरातील प्रवाशांना मोठा फायदाही सेवा सुरू झाल्यानंतर उरण आणि रायगड परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. मोरा ते भाऊचा धक्का हा जलमार्ग अवघ्या काही मिनिटांत पार होईल. त्यामुळे मुंबईला ये-जा करण्यासाठी लागणारा वेळ, खर्च आणि धोका लक्षणीवळ कमी होईल. उरण-फेरी व्हार्फ ही मुंबईसाठीची दुसरी महत्त्वाची रो-रो जोडणी ठरणार असून, पूर्व किनारपट्टीवरील वाहतूक गर्दी कमी करण्यास मोठी मदत होईल..Mumbai MHADA: म्हाडाची मोठी घोषणा! 'या' १६ सुविधा भूखंडांसाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू; अर्ज कसा करायचा?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.