esakal | मुंबई : एका बॉटलमध्ये डोस किती? माहिती अधिकार कार्यकर्त्याची चौकशीची मागणी | corona vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

मुंबई : एका बॉटलमध्ये डोस किती? माहिती अधिकार कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालाड : लशीच्या एका बॉटल (वायल) मध्ये नेमके डोस (vaccine) किती, १० असतील तर १२ कसे दिले आणि १२ असतील तर अधिकच्या दोन डोसचे काय झाले, याची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते आणि मुंबई काँग्रेसचे सचिव संतोष चिकणे (santosh chikane) यांनी केली आहे. कोव्हॅक्सिन (covaxin) आणि कोविशिल्डच्या (covishiled) एक बॉटलमधून ०.५ एम एलप्रमाणे जास्तीत जास्त १० डोस होतात, मग १२ डोस कसे दिले जातात, याबाबत चिकणे यांनी माहिती कायद्यांतर्गत याबाबत माहिती मागवली होती.

हेही वाचा: नवी मुंबई: एमआयडीतील कंपन्यांच्या उत्‍पादनात घट; पाण्यावाचून उद्योजकांचे हाल

२० सप्टेंबर रोजी त्यांना पी उत्तर विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका बॉटल (वायल)मध्ये १० ऐवजी ११ किंवा १२ डोस दिले जातात, असे म्हटले आहे. लस निर्मात्याकडून अधिक येते. त्यामुळे ११ किंवा १२ डोस देणे शक्य आहे, असे कळवले आहे. या माहितीच्या आधारावर संतोष चिकणे यांनी पालिका पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त आणि मुंबईपालिका आयुक्त तसेच आरोग्य मंत्री, पालकमंत्री यांना पत्र लिहून याबाबत चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, जर १० ऐवजी ११ किंवा १२ डोस शक्य असतील तर त्याचा गैरवापर होतो का, त्याची चौकशी पालिका प्रशासनाने करावी. कारण पैसे घेऊन लस दिल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.

हेही वाचा: डोंबिवली: वाहतूक विभागाची रिक्षाचालकांवर कारवाई

"वायलमध्ये थोडी लस निर्मात्याकडून पॅकिंगच्या वेळी जास्त येत असल्याने ११ किंवा १२ डोस शक्य होतात. तसेच कोणत्याही परिस्थितीत ०.५ एमएलचेच डोस दिले जातात."
- अमोल जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पी उत्तर विभाग.

"फक्त दहाच डोस होतात. त्यामुळे अधिक डोस शक्य नाही."
- वीरेंद्र चौधरी, काँग्रेसचे नगरसेवक आणि पालिका आरोग्य समितीचे सदस्य.

"पालिकेने माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिलेल्या माहितीनुसार जर ११ किंवा १२ डोस होत असतील तर अधिकच्या डोसचा हिशोब काय आणि किती? तसेच जर होत नसतील तर १२ डोस देण्यासाठी पालिका प्रशासनाने लशीचे प्रमाण ठरलेल्या प्रमाणापेक्षा कमी केले का?"
- संतोष चिकणे, सचिव मुंबई काँग्रेस आणि तक्रारदार.

loading image
go to top