
पालघर : पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई–वडोदरा एक्सप्रेसवेच्या कामाला आता अंतिम टप्पा आलेला असून, हा द्रुतगती मार्ग मार्च २०२६ मध्ये सुरू करण्याचा निर्धार संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील टप्पा क्रमांक ११ मधील गंजाड–तलासरी (२६ कि.मी.) भागाचे काम आर.के.सी. इन्फ्राबिट, गंजाड–मासवण (२६ कि.मी.) भागाचे काम मोंटो कार्लो, तर तिसऱ्या भागाचे काम जीआर इन्फ्रा या कंपन्यांना देण्यात आले आहे.