esakal | Mumbai: मराठवाडा विदर्भासाठी किती निधी दिला ते आता कळणार नाही : फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मराठवाडा विदर्भासाठी किती निधी दिला ते आता कळणार नाही : फडणवीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विदर्भ मराठवाड्याची वैधानिक विकास मंडळे अस्तित्वात आली नसल्याने या मागास भागाच्या विकासासाठी किती खर्च झाला ते कळणार नाही अशी खंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.विधीमंडळाच्या वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राने आयोजित केलेल्या अभ्यासवर्गात ते बोलत होते.

राज्याचा अर्थसंकल्प आमदारांना समजावून सांगणार्या अभ्यासवर्गात देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाला आमदारांनी मोठया संख्येने उपस्थिती नोंदवली.सर्व पक्षीय आमदार या वर्गात फडणवीसांचे भाषण ऐकण्यासाठी हजर होते.

हेही वाचा: पिंपरी : शहरातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे गुरुवारपासून खुली

विधीमंडळाचा मंच हा राजकीय नसल्याने तेथे आरोप करणार नाही पण राज्यपालांच्या अखत्यारीतील वैधानिक विकास मंडळांची स्थापना न झाल्याने तेथे रकमेचा विनियोग कसा झाला ते कळणार नाही.

अर्थसंकल्पविषयक पुस्तके जड वाटली तरी ती प्रत्यक्षात अत्यंत सोपी असतात.ती वाचायला घेतली की त्यातील माहिती उलगडत जाते.अत्यंत साध्या सोप्या भाषेतील ही माहिती वाचायला हवी

loading image
go to top