
Mumbai: संविधान धोक्यात असल्याच्या मुद्यामुळे लोकसभा निवडणकीत दलित-मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या मागे उभा राहिला. या लाटेत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पाचच्या पाचही लोकसभेच्या जागा आघाडीने जिंकल्या; मात्र विधानसभा निवडणुकीत लोकसभेचे समीकरण पूर्णपणे बदलले. राज्यात २९ राखीव विधानसभा मतदारसंघांपैकी २० जागा महायुतीने जिंकल्या; तर केवळ आठ जागा राखण्यात आघाडीला यश आले. यामध्ये पहिल्यांदा बौद्ध समाजाचे १० आमदार निवडून आले.