

Mumbai Water Metro Project Includes 250 Km Waterways 49 Terminals And Rock Dredging For Safe Navigation
sakal
-नितीन बिनेकर
कोची : मुंबई वॉटर मेट्रोच्या बोटी सुरू करण्यापूर्वी जलमार्ग सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. जलमार्गांची खोली, समुद्रतळाची रचना, गाळाचे प्रमाण आणि भरती-ओहोटीचा अभ्यास करून बोटींच्या सुरक्षित नौकानयनासाठी आवश्यक बाबी तपासण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी समुद्रतळ खडकाळ असल्याने अपेक्षित खोलीसाठी ‘रॉक ड्रेजिंग’ करावे लागू शकते. त्यामुळे बोटी आणि टर्मिनल उभारणीसोबतच जलमार्गांचा विकास हेही प्रकल्पातील महत्त्वाचे काम ठरणार आहे.