Mumbai Water Lake Level : मुंबईकरांना दिलासा! 'इतकी' भरली शहराला पाणी पुरवणारी सात धरणं

 Tansa Lake
Tansa Lake sakal

मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये अतापर्यंत ५०.१८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणातील पाणीपातळ वाढल्याने मुंबईतील नागरिकांना पाणीकपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दमम्यान धरणांमध्ये जमा झालेला पाणीसाठी हा गेल्या दोन वर्षीच्या तुलनेत अद्यापही कमीच आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. सध्या मुंबईची तहान भागवणाऱ्या या सातही धरणांमध्ये मिळून ७ लाख २६ दशलक्ष लीटरपेक्षा जास्त पाणीसाठी जमा झाला आहे. तर या सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लिटर (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) इतकी आहे.

 Tansa Lake
Pune Crime News : पोलीस दलात खळबळ! पुण्यात 'एसीपी'कडून पत्नी अन् पुतण्याची हत्या, स्वतःलाही संपवलं

२१ ऑक्टोबरला सर्व धरणे पुर्ण भरलेली असल्यास मुंबई शहराला वर्षभर पाणी व्यवस्थित पुरवलं जातं , सध्या फक्त तुळशी तलाव ओसंडून वाहतो आहे. तर तानसा आणि विहार ही धरणं ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. त्यामुळे धरणांच्या परिसरात पुढील दोन महिने चांगला पाऊस होणे गरजेचे आहे.

 Tansa Lake
"अजय देवगणला पैसे पाठवणार"; नाशिकमध्ये एकजण चक्क रस्त्यावर मागतोय भीक!; Video होतोय व्हायरल

धरणांमध्ये पाणीसाठा किती?

  • अप्पर वैतरणा - २१.३८ टक्के

  • मोडक सागर - ७८.२६ टक्के

  • तानसा- ८९.२७ टक्के

  • मध्य वैतरणा - ५९.१६ टक्के

  • भातसा - ४२.०८ टक्के

  • विहार - ८३.२७ टक्के

  • तुळशी - १०० टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com