मुंबईत शुक्रवारपर्यंत कसा असेल पाऊस, वाचा हवामानाचा अंदाज 

सुमित बागुल
Tuesday, 15 September 2020

ठाणे, पालघरमध्ये बुधवार आणि गुरूवारी जोरदार पाऊस

मुंबई : मुंबईतील अनेक भागात सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात फारशी तफावत जाणवली नाही. मात्र येत्या शुक्रवारपर्यंत मुमबीत हलक्‍या सरीच पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तर, ठाणे आणि पालघरमध्ये बुधवार आणि गुरुवारी जोरदार पावसाचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत सोमवारी संध्याकाळी कुलाबा येथे कमाल 30 आणि किमान 25.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, सांताक्रुझमध्ये कमाल 32 आणि किमान 25.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. दिवसभर शहरात पावसाळी ढग दाटून होते. काही भागात पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या.

महत्त्वाची बातमी - आणखी एक मोठा स्कॅम? आता स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक

शुक्रवारपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहाणार असून पुढील दोन दिवस तापमानही याच पातळीवर राहाण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवलंय. ठाणे, पालघरमध्ये आज हलक्‍या सरी कोसळणार असून बुधवार आणि गुरुवारी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर ओसरण्याची शक्‍यता मुंबई वेधशाळेने व्यक्त केली आहे. 

रायगडमध्ये बुधवार, शुक्रवारी जोरदार पाउस 

रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, बुधवार आणि शुक्रवारी या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.

mumbai weather forecast IMD predict light rain in city till friday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai weather forecast IMD predict light rain in city till friday