आणखी एक मोठा स्कॅम? आता स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक

अनिश पाटील
Monday, 14 September 2020

मुंबईतील खासगी कंपनी आणि अधिका-यांवर गुन्हा, सीबीआयची मुंबईत शोध मोहिम

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ची तब्बल 338 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मंबईतील खासगी कंपनी आणि तिच्या अधिका-यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच (CBI) ने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या ठिकाणांवर CBI ने शोध मोहिम राबवली आहे.

कांदिवलीतील एस डी अल्युमिनियम लिमिटेड कंपनी आणि कंपनीचे चेअरमन, संचालक व इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सीबीआयने दिली. तक्रारीनुसार, आरोपी कंपनी  अल्युमिनियमची निर्मीती करत असतानाही औषध निर्मीती, अन्न आणि एफएमसीजीचे पॅकिंग बनवत असल्याचे अर्जात म्हटले होते. तसेच बनावट कागदपत्री बँकेत दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यता आला आहे.

या सोबतच कंपनीचा पैसा दुसरीकडे वळवण्यात आला आहे. त्यामुळे एसबीआयला 338 कोटी 52 लाखांचे नुकसान झाल्याचे सीबीआयने सांगितले. याप्रकरणी कंपनी आणि आरोपींशी संबंधीत ठिकाणावर सीबीआयने शोधमोहीम राबवली आहे. 

या महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

-- आदित्य ठाकरेंचं उठणं-बसणं मुव्ही माफिया आणि सुशांतच्या खुन्यांसोबत, कंगनाने पहिल्यांदाच थेट नाव घेत केलं ट्विट

-- सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी FIR का दाखल केला नाही? अनिल देशमुखांनी केला 'मोठा' खुलासा

-- गुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत म्हणत आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड कनेक्शनबाबत आशिष शेलार म्हणतात...

-- कंगना गेली 'मनाली'ला आणि शिवसेनेकडून कंगनाबद्दल आली 'मोठी' प्रतिक्रिया

-- मुंबईकरांनो! मोकळा श्वास घ्या, मुंबईतील हवेची गुणवत्ता उत्तम

( संपादन - सुमित बागुल ) 

state bank of india duped for 338 crore cbi relieved information

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state bank of india duped for 338 crore cbi relieved information