झाले मोकळे आकाश... तीन दिवसांपासून असलेलं ढगाळ वातावरण अखेर हटले

झाले मोकळे आकाश... तीन दिवसांपासून असलेलं ढगाळ वातावरण अखेर हटले

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईवरील ढगाळ वातावरण आज अखेर हटले. त्यामुळे दुपारनंतर मुंबईकरांनी 'झाले मोकळे आकाश'चा आनंद घेतला. गेल्या 24 तासात मुंबईत कुलाबा येथे 6.2 मिमी, सांताक्रूज येथे 1.1 मिमी पावसाची नोंद झाली. तर आर्द्रता अनुक्रमे 75 टक्के आणि 77 टक्के नोंदवली गेली.

मुंबईकरांनी ऐन थंडीत आज ही पावसाचा अनुभव घेतला. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि नाशिकमध्ये सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मुंबईत साधारणता दुपारी 12 नंतर पावसाने उघडीप घेतली. डिसेंबर महिन्यात पाऊस पडण्याची ही तुरळक घटना असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे.

रायगडसह मुंबई,पालघर-ठाण्यातील काही परिसर, नाशिकमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळाले. त्यासह पुण्यातील घाट परिसरात देखील मोठ्या प्रमाणत ढगाळ वातावरण दिसले. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर परिसरात तिसऱ्या दिवशी रिमझिम पाऊस बरसला. ढगाळ वातावरण, ओले झालेले रस्ते आणि रिमझिम पावसामुळे अंधूक प्रकाश असल्याने ब-याच ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जाणवली.

मुंबईत दुपारनंतर पाऊस थांबल्याने किमान तापमानात काहीशी वाढ झाल्याचे दिसले. कुलाबा येथे कमाल तापमान 27 अंश सेल्सियस तर सांताक्रूज तेथे कमाल तापमान 26.9 अंश सेल्सियस नोंदवले गेले. कमाल तापमानात पुढील काही दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत पाऊस थांबला असला तरी सायंकाळी उशिरापर्यंत पुणे, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसासह अंशतः ढगाळ आकाश दिसले. 

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai weather imd predicts rain temperature dips

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com