esakal | मुंबईत पावसाचा हाहा:कार, 14 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत पावसाचा हाहा:कार, 14 जणांचा मृत्यू

मुंबईत पावसाचा हाहा:कार, 14 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
नामदेव कुंभार

शनिवारी रात्री मुंबई आणि उपनगराला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. रात्रभर पावसाने ठिय्या मांडला होता. त्यामुळे सकल भाकात पाणी साठले आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे मुंबई दोन ठिकाणी 14 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. विक्रोळी येथे तीन जणांचा तर चेंबूरमध्ये 11 जणांचा घराचा छत कोसळून मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

चेंबूर आरसीएफ भारत नगर येथे दरड कोसळून घर कोसळून 11जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान विक्रोळी येथील डोंगरळ भाग असलेल्या पंचशीलनगरमध्ये घराचा छत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.डोंगराळ वस्तीमध्ये एका घरावर दुसरे असे तीन-चार घरे एकमेंकावर कोसळली आहेत. या मलब्याखाली तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मृतामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगात सुरु आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मृताची संख्या आणखी वाढू शकते.

हेही वाचा: नीरेत मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची भर चौकात हत्या

सध्या पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, पुढील दोन ते तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आवशकता नसेल तर घराबाहेर पडू नका अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. शनिवापप्रमाणेच मुंबईत पावसाचा जोर राहिला तर रविवारी शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपग्रह चित्रात मुंबई, ठाण्यासह कोकणात ढगांची दाटी दिसत असून द. मध्य महाराष्ट्रातही मोठे ढग दिसत आहेत, असे ट्विट हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी शनिवारी रात्री केले होते.

हेही वाचा: चाकणमध्ये सैराट! मुलीला पळवून नेल्याच्या रागात दोघांचा खून

मुंबईसह इतर ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वेचं वेळापञक कोलमंडलं आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर अनेक स्थानकांवर रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. ठाणे /कल्याण, कर्जत/ खोपोली, कसारा सेक्शन, वाशी / पनवेल, ट्रान्स हार्बर लाइन, नेरूळ/बेलापूर, खारकोपर लाइन वरील गाड्या कार्यरत, तर एक्सप्रेस गाड्याच्या वेळापञकात बदल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

loading image