Mumbai : पश्चिम रेल्वेचे ऑपरेशन अमानत सुसाट! अवघ्या महिन्याभरात ३.१६ कोटींच्या वस्तू केल्या परत

Mumbai-Local-Train
Mumbai-Local-Trainsakal

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने गेल्या महिन्याभरात ऑपरेशन अमानत अंतर्गत ३.१६ कोटी किमतीचे सामान प्रवाशांना परत केले आहे. यामध्ये प्रवाशांचे हरवलेले किंवा विसरलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने,रोख या सारख्या मौल्यवान वस्तूचा समावेश आहे.

Mumbai-Local-Train
Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदेंना लोकसभेत चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीकडून 'या' नावाची चर्चा

रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ ) जवानांनी रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, ऑपरेशन "अमानत" अंतर्गत आरपीएफ ने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे. रेल्वे स्थानकात, किंवा रेल्वे गाड्यात प्रवाशांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख इत्यादी यासारख्या मौल्यवान वस्तू प्रवाशांना परत मिळवून दिल्या आहेत.

Mumbai-Local-Train
DRDO : कुरुलकरांच्या जागी डॉ. जोशी! डीआरडीओच्या संचालकपदी नवी नियुक्ती

२०२३ मध्ये (मे पर्यंत) ऑपरेशन 'अमानत' अंतर्गत, आरपीएफने १ हजार ४३७ प्रवाशांच्या सुमारे ३.१६ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. यामध्ये ८३८ बॅग, ५३ पर्स, १२ लॅपटॉप, ३० मोबाईल फोन, १४ सोन्याच्या चेन आणि ३,१५,९९,५७६ रुपये किमतीच्या १६० इतर वस्तू पडताळणीनंतर प्रवाशांना परत करण्यात आल्या आहे.

२४ मे २०२३ रोजी मुंबई विभागाच्या आरपीएफ पोलिसांनी विविध स्थानकावर १२ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सुमारे १ लाख ७९ हजार ५०० रुपये किमतीची हरवलेली वस्तू परत मिळवून त्यांच्या हक्काच्या मालकांना सुपूर्द केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com