मुंबई: पश्‍चिम रेल्वे कोरोनाशी झुंजण्यास सज्ज

जगजीवन राम रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी होणार
मुंबई: पश्‍चिम रेल्वे कोरोनाशी झुंजण्यास सज्ज
sakal

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवला जात आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याच्या पातळीवर सतर्कता बाळगली जात असून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्यावतीने ऑक्सिजन प्लांट उभारणी केली जात आहे. मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जात आहे. ऑक्टोबरमध्ये हे दोन्ही प्लांट पूर्ण होणार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.

मुंबई: पश्‍चिम रेल्वे कोरोनाशी झुंजण्यास सज्ज
भाजपला अंतर्गत कूरघोडी महागात पडणार; ऐरोली मतदार संघात मंदा म्हात्रेंचा शिरकाव

कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असताना देशात ऑक्सिजनअभावी अनेकांचे बळी गेले. त्यावेळी ऑक्सिजन पुरवठा करण्यात भारतीय रेल्वेची ऑक्सिजन एक्स्प्रेस आघाडीवर होती. आता रेल्वे स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभा करत आहे. पश्चिम रेल्वे झोनमधील मुंबई, अहमदाबाद, रतलाम, राजकोट, भावनगर, बडोदा या विभागातील रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत.

जगजीवन राम रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी एक कोटी १२ लाखांचा खर्च होईल. त्यातून मिनिटाला ५०० लिटर ऑक्सिजन निर्मिती होणार असून दरदिवशी २०० रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागेल. जगजीवन राम रुग्णालयातील रुग्णांना प्राधान्याने ऑक्सिजन प्लांटमधील ऑक्सिजनचा पुरवठा होईल.

तसेच शहरातील इतर रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यास त्यांनाही पुरवठा केला जाईल. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या ऑक्सिजन प्लांटची मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आॅक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवला होता. त्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था पुढाकार घेऊन असे प्लांट उभारत आहेत.

रुग्णालयात वैद्यकीय रोबोट

जगजीवन राम रुग्णालय विशेष कोविड-१९ उपचार सुविधा सुरू केली आहे. यासह इंट्युबेशन बॉक्स तयार करण्यात आला आहे. यासह रुग्णालयात वैद्यकीय रोबोट असून तो तापमान, रक्तदाब, हृदयगती आणि ऑक्सिजन तपासण्याचे काम करून कोरोना रुग्णांचे निरीक्षण करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com