esakal | पाणी साठवा! मुंबईत १३ जुलैला 'या' भागातील पाणी पुरवठा बंद किंवा कमी दाबाने होणार
sakal

बोलून बातमी शोधा

water supply

पाणी साठवा! मुंबईत १३ जुलैला 'या' भागातील पाणी पुरवठा बंद किंवा कमी दाबाने होणार

sakal_logo
By
सुमित सावंत

मुंबई : मुंबईत विविध नागरी सेवा-सुविधा देणारी महानगरपालिका (BMC) मुंबईकरांना पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी (water supply) मिळावे, यासाठी कार्यरत असते. मुंबईकरांना करण्यात येणारा दैनंदिन पाणीपुरवठा (Daily Water Supply) हा सुरळीतपणे व्हावा, यासाठी महानगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा विषयक परिरक्षणाची विविध कामे वेळोवेळी आवश्यकतेनुसार हाती घेतली जातात. याच कामांचा भाग म्हणून पश्चिम उपनगरातील (Western Mumbai) एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या ३ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तांत्रिक अडचणी (Technical Error) उद्भवल्या होत्या. ( Mumbai Western side Area Water Supply changes due to some technical error)

या अनुषंगाने सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने सदर अडचणींबाबत आवश्यक ती तांत्रिक उपाययोजना हाती घेण्यात येत असून, या अंतर्गत पाणीपुरवठ्याशी संबंधीत झडप (बटरफ्लाय व्हॉल्व) येत्या १३ जुलै २०२१ रोजी बदलण्यात येणार आहे. यामुळे एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या ३ विभागातील जुहू, विलेपार्ले, सांताक्रुज व खार (पश्चिम), अंधेरी (पूर्व व पश्चिम) इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा १३ जुलै २०२१ रोजी बंद राहणार आहे किंवा कमी दाबाने होणार आहे. तरी संबंधीत परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी पाण्याचा साठा करुन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.

हेही वाचा: महाराष्ट्रात 'एसटी'ची आता हायटेक प्रवासी वाहतूक, व्हिटीएस प्रणालीचा शुभारंभ

सविस्तर तपशील असा की, महानगरपालिकेतर्फे वेरावली जलाशय क्र ३ चे भाग क्र २ चे वांद्रे आऊटलेट वर असलेल्या १२०० मिलि मीटर व्यासाची झडप बदली करण्याचे करण्याचे काम मंगळवार दिनांक १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. सदर कालावधीत दिनांक १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागातील खालील नमूद परिसरात उपरोक्त नमूद कामाच्या कालावधीत काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्याचप्रमाणे के पश्चिम व के पूर्व विभागातील खालील नमूद परिसरात काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणारा परिसर व पाणी पुरवठा खंडित होणारा परिसर बाबतची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहेः-

. के पश्चिम विभाग

गिलबर्ट हिल – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ८.३० ते ११.१५ वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

जुहू-कोळीवाडा (उर्वरित पुरवठा) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत असणा-या परिसरात सकाळी ८.०० ते ९.१५ वा. या कालावधी दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

चार बंगला – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.१५ ते २.१० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

विलेपार्ले (पश्चिम), जे. व्ही. पी. डी., नेहरु नगर – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.५५ वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील.

हेही वाचा: बनावट लसीकरण रोखण्यासाठी व्हायल्ससंबंधी BMC ने घेतला महत्त्वाचा निर्णय

२. के पूर्व विभाग

विलेपार्ले (पूर्व) (संपूर्ण विलेपार्ले पूर्व डोमेस्टिक एअरपोर्ट) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

सहार मार्ग, ना. सी. फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली गावठाण, तेली गल्ली, साईवाडी, जिवा महाले मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, जुना नागरदास मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.०० ते १०.३० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

३. एच पश्चिम विभाग

खोतवाडी, गझदरबंध, एस. व्ही. मार्ग (खार), लिंकींग रोड (खार), सांताक्रुझ (पश्चिम), खार (पश्चिम) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.३० ते ९.०० वाजेपर्यंत असणा-या परिसरात सकाळी ६.३० ते ९.०० या कालावधी दरम्यान पाणीपुरवठा होईल.

एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागातील सदर परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, सदर कामाच्या दरम्यान दिनांक १३ जुलै २०२१ रोजी रात्री १०.०० वाजेपासून सकाळी १०.०० वाजेपर्यंत काही ठिकाणी कमी दाबाने, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित राहणार आहे, याची नोंद घेण्यात यावी. तसेच या अनुषंगाने नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी पाण्याचा साठा करुन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे

loading image