Vadapav: वडापाव का महागणार? हे मोठं कारण आलंय समोर

वडापाव का महागणार? जाणून घ्या कारण
Vadapav
Vadapavsakal

महाराष्ट्र असो की मुंबई प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा वडापाव आता महागणार असल्याची दाट शक्यता आहे. मुंबईच्या लोकांचा जर सर्वांत जास्त आवडता खाद्यपदार्थ कुठला असेल तर तो नक्कीच वडापाव हे नाव समोर येणार.

साधारणतः १० रुपयांपासून विकल्या जाणाऱ्या आणि भुकेला साथ देणाऱ्या वडापाव मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनलाय. सध्या हाच वडापाव एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलाय, ते कारण म्हणजे वडापाव महागणार. वडापाव महागण्यामागे एक मोठं कारण समोर आलंय. (mumbai: why price of vadapav will increase)

हे ही वाचा - राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

वडापाव का महागणार?

पावाच्या दरात वाढ झाल्याने आता वडापावचा भाव वाढणार आहे. पावसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पाव बनवण्यासाठी लागलेला कच्चा माल महागल्याने पावचे दर वाढणार आहे. त्यामुळेच याचा परिणाम थेट वडापाववर पडणार.

आतापर्यंत पावाचा दर साधारणत: २ रुपये प्रति पाव असा होता. यात उत्पादन खर्च दीड रुपया होता. मात्र आता उत्पादन खर्चच प्रति पाव २ रुपये झाला त्यामुळे पावाची किंमत वाढली. आता ३ रुपयांपर्यंत पावाची किंमत वाढविण्यात आली आहे. सहा पावांची लादी आता १२ ऐवजी १६ रुपयां मिळणार असून विक्रेते आता ही लादी २२ ते २४ रुपयांना विकू शकतात. जर असे झाले तर वडापावचे भाव सुद्धा वाढणार.

Vadapav
Viral Video: जा बाई एकदाची माहेरी! माहेरच्यांनीच उचलून बसवलं गाडीत

वडापावची सुरुवात कशी झाली?

 १९६६ मध्ये अशोक वैद्य या व्यक्तीने दादर च्या रेल्वे स्टेशन वर वडापाव विकण्यास सुरुवात केली होती आणि वडापाव चा स्टॉल लावला होता. त्यानंतर १९७० आणि १९८० च्या दरम्यान राज्यात अनेक कारखाने बंद झाले होते. तेव्हा हजारो मजुरांनी वडापाव चे स्टॉल लावले होते. त्यावेळी शिवसेनेने वडापाव विकणाऱ्यांना प्रोत्याहन दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com