अरे देवा! मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी लागणार 'इतक्या' महिन्यांचा कालावधी

corona
corona

मुंबई: संपूर्ण देश कोरोनासारख्या भयंकर संकटाचा सामना करत आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत. त्यामुळे मुंबई शहर हे रेड झोनमध्ये आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यासह मुंबईतल्या आर्थिक व्यवहाराची घडी विस्कटली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरातून निम्म्याहून जास्त आर्थिक व्यवहार हाताळले जातात. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशासह मुंबईतील अर्थव्यवस्था बिघडली आहे. 

याचा सर्वाधिक फटका हा उद्योग क्षेत्रांना बसला आहे. तसंच बांधकाम व्यावसायिकांही याचा परिणाम उद्भवला आहे. दरम्यान आता आलेल्या अहवालानुसार, लॉकडाऊननंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान 9 ते 12 महिने लागणार आहेत.

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीनं (क्रेडाई-एमसीएचआय) आपल्या नव्या अहवालात हे नमूद केले आहे. त्यामुळे एक लक्षात येतं की, मुंबईतील आर्थिक घडी नीट होण्यासाठी आणखीन एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. 

क्रेडाई-एमसीआयने प्रश्नावलीच्या माध्यमातून 500 सदस्यांच्या माहितीच्या आधारानं हा अहवाल प्रकाशित केला आहे. 60 टक्के विकासक मानतात की, लॉकडाऊननंतर 9 -12 महिन्यांत रिअल इस्टेटचा व्यवसाय सामान्य होताना दिसेल तर केवळ 30 टक्के विकासकांच्या मते 6 महिन्यांत व्यवसाय सामान्य होईल, असं या अहवालाच्या संशोधनातून समोर आलं आहे. हा अहवाल तयार करताना क्रेडाई-एमसीआयआयने त्यांच्या सदस्यांनी यात सहभाग घेतला.

बांधकाम व्यवसायाला फटका 

सध्या कोविड 19चं संकट आहे. त्यात आधीपासून रिअल इस्टेट हे नोटाबंदी, रेरा आणि जीएसटी सारख्या संकटांना तोंड देत आहे. या परिस्थितीतही 83 टक्के व्यावसायिक स्वतःचा व्यवसायात बदल न करता बांधकाम क्षेत्रात राहू इच्छित असल्याचं या अहवालात स्पष्ट झालं आहे. क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष नयन शाह यांनी म्हटलं की, गेल्या 3 वर्षांपासून बांधकाम व्यावसायिक अनेक अडचणींना सामोरं जात आहेत. सादर केलेल्या अहवालानुसार 83 टक्के व्यावसायिक अद्यापही आपल्या व्यवसायावर ठाम आहेत. 

या सर्वेक्षणानुसार सध्या उद्भवलेल्या कठीण परिस्थितीतही 83 टक्के विकासकांनी आपल्या उद्योगाशी दृढता आणि आत्मविश्वास दाखवून याच व्यवसायात कायम राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं नयन शाह म्हणालेत. दरम्यान योग्य किंमत मिळाली तर जवळपास 50 टक्के विकसक नवी मालमत्ता खरेदी करण्यासाठीही इच्छुक आहेत. तसेच 2021 सालापर्यंत निवासी क्षेत्रात प्रकल्प सुरू करण्याची तयारीही दाखवली आहे. भविष्यातील प्रकल्पांमध्ये WHF (White House Fellow ship)विचारात घेऊन डिझाइनमध्ये काही बदल घडवणं यानंतर बंधनकारक असेल, पण काही विकासक सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांतून प्रयत्न करण्यासाठी उत्सुक असल्याचंही शाह यांनी सांगितलं. 

पुढे ते सांगतात, रिअल इस्टेट उद्योग हा भारतात अस्तित्त्वात असणाऱ्या इतर उद्योगांप्रमाणेच स्वतः अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताहेत. त्यादृष्टीनं हा एक महत्त्वपूर्ण संशोधन अहवाल आपण मानला पाहिजे. 

बांधकाम क्षेत्रात कामगार आणि कुशल अशा कारागिरांची सध्या कमतरता आहे. मात्र तरी सुद्धा बरेच असे विकासक आपला प्रकल्प कसा पूर्ण करता येईल. याकडे गांभीर्यानं लक्ष केंद्रीत करत आहेत. दुसरीकडे या अहवालातून आणखी एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे,  95 टक्के विकासक Essential commodities sector किंवा करमणूक यासारख्या क्षेत्रातही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही दिसून आलं. 

अहवालात या गोष्टींचा समावेश 

क्रेडाई-एमसीएचआय या संशोधन अहवालात अनेक आर्थिक, सरकारशी संबंधित, कामगारांशी संबंधित, प्रकल्प पूर्ण करणे आणि ग्राहकांशी संबंधित रणनीती नमूद करण्यात आल्यात. काही विकासक एक धोरणात्मक पवित्रा घेऊन एकमेकांच्या सहकार्याने आणि भागिदारी करत प्रकल्प करत आहेत. तसंच ते विकासक बार्टर एग्रिमेंट करू शकतील असे सप्लायर्स आणि व्हेंडर्सना प्राधान्य देत आहेत. 

क्रेडाई-एमसीएचआय नेमकं काय आहे? 

1982 साली महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीची (क्रेडाइ-एमसीएचआय) स्थापना झाली. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील ही प्रमुख आणि मान्यताप्राप्त संघटना आहे. ही संघटना बांधकाम विकास क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना एका व्यासपीठावर आणते आणि या उद्योगाला भेडसावणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याचे निराकरण करते.

मुंबईतील 1800 अग्रगण्य विकासकांच्या सदस्यत्वासह क्रेडाई-एमसीएचआयने मुंबई महानगर क्षेत्रातही विस्तार केला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-विरार शहर, रायगड आणि नवी मुंबई येथे संघटनेची कार्यालये आहेत. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील निवासी आणि व्यापारी मालमत्तांच्या संघटित विकासकामांपैकी 80 टक्के कामांचे विकासक क्रेडाइ-एमसीएचआय या संघटनेचे सदस्य आहेत.

mumbai will take 1 year to get back to normal read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com