esakal | काय सांगता..! आता कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार? वाचा कसा तो...
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगता..! आता कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार; वाचा कसा तो...

मुंबईतील ज्या रुग्णांना कोरोनाची कमी लक्षणे असतील तसेच ज्यांची प्रकृती गंभीर नसेल त्यांच्यावर घरीच उपचार करायची व्यवस्था रेल्वे स्थानकांवर रुग्णांना सेवा देणाऱ्या वन रुपी क्लिनिक तर्फे करण्यात आली आहे. 

काय सांगता..! आता कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार? वाचा कसा तो...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शहरातील ज्या रुग्णांना कोरोनाची कमी लक्षणे असतील तसेच ज्यांची प्रकृती गंभीर नसेल त्यांच्यावर घरीच उपचार करायची व्यवस्था रेल्वे स्थानकांवर रुग्णांना सेवा देणाऱ्या वन रुपी क्लिनिक तर्फे करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचली का? जबाबदारीचं भान ठेवा, कोरोनाला गांभीर्याने घ्या - मुख्यमंत्री

नुकतेच महापालिका आयुक्तांनीही अशाच आशयाचे विधान केले होते, त्यानुसार वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनीदेखील ही बाब सहज शक्य असल्याचे सकाळ ला सांगितले. जे गंभीर किंवा गुंतागुंत असलेले रुग्ण असतील त्यांनी मात्र रुग्णालयातच उपचार घ्यावेत, असेही ते म्हणाले. आज अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना ठेवायला जागा नाही, त्यामुळे वैद्यक कर्मचाऱ्यांवरही प्रचंड ताण येत आहे. खासगी रुग्णालयात प्रचंड खर्च होतो तर विलगीकरण केंद्रातही रुग्णांची आबाळ होत असल्याचे व्हिडियो समोर येत आहेत. त्यामुळे ही नवी उपचारपद्धती रुग्णांना वरदान ठरू शकते, असे बोलले जात आहे. 

ही बातमी वाचली का? तीन माणसं बोलली की रडली..? महाविकास आघाडीवर भाजपचा पलटवार 

खरे पाहता ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत किंवा अत्यंत कमी प्रमाणात लक्षणे दिसतात, त्यांना रुग्णालयात जाण्याची गरज नसते. कोरोना म्हणजे साधे व्हायरल इन्फेक्शन असून घरीच उपचार केल्याने आपण बरे होतो, हा आत्मविश्वास रुग्णांमध्येही जागवण्याची गरज आहे, असेही डॉ. घुले म्हणाले. या रुग्णांनी तेलकट-तुपकट असे न खाता अंडी, कडधान्य, फळे असा सकस आहार घ्यावा. त्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल, असेही ते म्हणाले. 

ही बातमी वाचली का? स्थलांतरीत कामगारच नव्हे तर दुकानदारही मुंबईबाहेर चालले; वाचा बातमी सविस्तर

मुंबईत वन रुपी क्लिनिककडे सुमारे 40 एमडी डॉक्टर आहेत, त्यांच्यावर 20 ते 25 रुग्णांची जबाबदारी दिली जाईल. एखाद्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली की त्याने वन रुपी क्लिनिकशी संपर्क केल्यावर एमडी डॉक्टर प्रथम व्हिडियो कॉल करून सर्व माहिती घेतील किंवा पीपीई किट घालून त्याच्या घरी जाऊन तपासणी करतील. लगेच उपचारांना सुरुवात होईल.

ही बातमी वाचली का? व्हायरल झालेल्या अधिसूचना खोट्या, सरकारकडून स्पष्टीकरण

24 तास डाॅक्टर उपलब्ध
 सलाईन-इंजेक्शनची गरज असल्यास त्यानुसार किंवा हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, टॅमीफ्ल्यू, अँजिड्रोमायसीन, आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे ठरलेले डोस दिले जातील. ताप तसेच ऑक्सिजन पातळी मोजायला उपकरणे ठेवली जातील. रोज फोनवरून चौकशी केली जाईल, संपर्कासाठी चोवीस तास डॉक्टर उपलब्ध असतील. एक दिवसाआड डॉक्टर येऊन तपासणी करतील, शेवटी रक्तचाचणी व 14 दिवसांनंतर कोरोना चाचणी केली जाईल. या सर्व उपचारांचे (औषधांखेरीज) केवळ पंचवीस हजार रुपये घेतले जातील, असेही डॉ. घुले यांनी सांगितले. यासाठी 9819931418 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

loading image