

Worli Clash Over DJ Ban During Bhim Jayanti Celebrations
esakal
मुंबईतील वरळी भागातील बीबीडी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या भीम जयंती उत्सवात नागरिक आणि पोलिस यांच्यात थेट सामना झाला. उत्सवाच्या मुख्य आकर्षण असलेल्या डीजे लावण्यास परवानगी नाकारल्याने भीमसैनिकांचा संताप ओसंडून वाहू लागला. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला.