Hit and Run
Hit and Runsakal

Hit and Run : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ‘सिरीअस’ माणूस नाही;मुंबईतील ‘हिट अँड रन’वरून नाना पटोले यांची टीका

मुंबईमध्ये झालेली ‘हिट अँड रन’ची घटना भयावह अशी घटना आहे. या घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाने महिलेला चिरडले. सत्तेचा माज सरकारला आलेला आहे.
Published on

मुंबई : मुंबईमध्ये झालेली ‘हिट अँड रन’ची घटना भयावह अशी घटना आहे. या घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाने महिलेला चिरडले. सत्तेचा माज सरकारला आलेला आहे.

महाराष्ट्राच्या विकासाची गती थांबवण्यासारख्या या घटना आहेत. शिंदे यांनी सांगितले आहे की आम्ही आरोपींना पाठिशी घालणार नाही मात्र आम्हाला यावर विश्वास नाही. मुख्यमंत्री ‘सिरीअस’ माणूस नाही. आपली खुर्ची टिकवणे आणि भ्रष्टाचार, कटकारस्थान निर्माण करणे हे त्यांच्यासाठी गौरव आणि अभिमानाचा असल्याची बोचरी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे यांच्यावर केली. 

पटोले यांनी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांच्यावरही टीका केली. ज्यांनी खोटे बोलून सत्ता घेतली ते खोट्या नॅरेटिव्हबद्दल बोलत असेल तर काय म्हणावे, असा सवाल त्यांनी केला. फडणवीसच खोट्या नॅरेटिव्हचे सूत्रधार आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत चुकीचा नॅरेटिव्ह पसरवले जात आहे, आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असेही त्यांनी सांगितले.  नाशिकच्या घटनेवरून सुद्धा पटोले यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की कोणत्या विभागातील अधिकारी सुरक्षित आहे हाच प्रश्न आहे. एक्साईजच्या अधिकाऱ्यांना मारले जात आहे. अशा घटना रोजच घडत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, असेही पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com