मुंबईकर तरुणींमध्ये मासिक पाळीतल्या स्वच्छतेबाबत वाढली जागरुकता

मुंबईकर तरुणींमध्ये मासिक पाळीतल्या स्वच्छतेबाबत वाढली जागरुकता

मुंबई: मासिक पाळी दरम्यानच्या स्वच्छतेबाबतची मुंबईकर तरुणींमध्ये जागरुकता वाढली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 05 मधून ही दिलासादायक बाब समोर आली आहे. तरुणींमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबतची जागृती तब्बल 15 टक्क्यांनी वाढली आहे. 

2015-16 मध्ये हे प्रमाण 83.8 टक्के होते. तर, हेच प्रमाण 15 टक्क्यांनी वाढून 99 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, मासिक पाळीबाबत वाढलेल्या जनजागृतीमुळे हे शक्य झाले असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय, जेनेटिकल इन्फेक्शन आजाराचे प्रमाण कमी होण्याची आशा वाढली असल्याचे स्त्रीतज्ज्ञ सांगतात.

सुरु असणारे वर्ष कोविड वर्ष म्हणून ओळखले जाते. या वर्षात अनेक पातळ्यांवर नकारात्मक घडामोडी झाल्या. या कोरोना काळातच तरुणींमध्ये सॅनिटरी नॅपकिन मिळणे अवघड झाले होते. लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद असल्याने पॅड मिळवणे महिलांसाठी दुरापास्त झाले होते. तरीही अशा स्थितीतही शरीर स्वच्छतेकडे लक्ष देणे महत्वाचे होते.

याविषयी बोलताना जे जे रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ प्रो. डॉ. राजेश्री कटके यांनी सांगितले की, अशा कठीण काळात ही महिलांनी शरीर स्वच्छतेला महत्व दिल्या बद्दल त्यांचे कौतुक करावे लागेल. हा काळ ओळखूनच आम्ही वेबिनारमधून मासिक पाळी दरम्यानच्या स्वच्छतेवर अनेक जागरूकता व्याख्याने घेतली. लॉकडाऊनच्या काळातच नव्हे तर सदा सर्वदा महिलांनी आरोग्याला महत्व देत शरीर स्वच्छता ठेवली पाहिजे. कारण स्वच्छता ठेवल्यास जनायटल इन्फेकशन होणार नाहीत. बऱ्याच वेळा घराबाहेर पडल्यावर टॉयलेटची सुविधा उपलब्ध नसल्याने महिला बाहेर जाणे टाळतात. त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढत असते. शिवाय शारीरिक स्वच्छता नसल्यास रोग प्रतिकार शक्ती ही खालावते. त्यातून विषाणू किंवा जिवाणू शरीरात आजार निर्माण करण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच महिलांमध्ये स्व स्वच्छतेबद्दल वाढती जागरूकता ही चांगली बाब असल्याचे डॉ. कटके म्हणाल्या.

सर्वेक्षणावर संशय

मुंबईत एवढ्या संख्येने तरुणींना शारीरिक स्वच्छता पुणे शक्यच होणार नाही. कारण, मुली किंवा महिलांना अनेकदा शौचालये उपलब्ध होत नाहीत. शिवाय, ज्या शौचालय जातात तिथे पाणीही उपलब्ध होत नाही. काही मुलींना सॅनिटरी नॅपकिन किंवा इतर गोष्टी खरेदी करणे परवडत नाहीत.15 ते 24 या वयोगटातल्या मुली सॅनिटरी पॅड्स, कप्स आणि कापड वापरतात. शिवाय, अधिकतर मुली कापडाचाच जास्त वापर करतात. एवढ्या सर्व गोष्टींची दुरापास्त असताना 99 टक्क्यांपर्यंत स्वच्छता पोहोचणे यावर प्रश्नचिन्ह आहे. हा सर्वे कोणत्या पातळीवर केला याचा आढावा घेणे गरजेचे आहे असे केईएम रुग्णालयाच्या प्राध्यापक डॉ. कामाक्षी भाटे यांनी सांगितले.

सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लागू नये

ही खूप स्वागतार्ह बाब आहे की तरुणींमध्ये जनजागृती वाढते आहे हे सर्वांचेच यश आहे. प्रसार माध्यम, रुग्णालये, आणि यंत्रणेमध्ये जनजागृती करत आहेत त्यांचं यश आहे. सॅनिटरी पॅडवर जीएसटी माफ केलं पाहिजे. कारण आता ही जास्तीत जास्त महिला कापडाचा वापर करतात. अंगणवाडी सेविका रुग्णालयातील कर्मचारी यांनी जी जनजागृती केली आहे. त्यामुळे तरुणींमध्ये सजगता वाढत आहे. सॅनिटरी पॅड जे जीएसटीमुळे त्याची किंमत वाढते आहे. त्याची किंमत कमी करून त्याला अत्यावश्यक गोष्टींमध्ये समावेश केला पाहिजे. ज्यामुळे जास्तीत जास्त महिला त्याचा वापर करू शकतील, असे मत सामाजिक कार्यकर्ता मुमताज शेख यांनी मांडले आहे.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai youth girl increased Awareness hygiene during Monthly periods

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com