उरणमधील टेनिस क्रिकेटपटूचे इंग्लंडमध्ये चौकार-षटकार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

इंग्लंडमध्ये होणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात उरण तालुक्‍यातील अष्टपैलू खेळाडू विश्वजीत ठाकूर याची निवड झाली आहे.

मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ दाखल झाला आहे. भारत, इंग्लंड, युगांडा, ब्राझील, जर्मनी आणि इंडोनेशिया देशांचा स्पर्धेत समावेश आहे. आपल्या संघात उरण तालुक्‍यातील अष्टपैलू खेळाडू विश्वजीत ठाकूर खेळत आहे. 

एकेकाळी गल्ली क्रिकेट म्हणून ओळखले जाणारे टेनिस क्रिकेट आता बहरले आहे. त्याचे आंतराष्ट्रीय सामनेही होत आहेत. आखाती देशात तर मोठमोठ्या स्पर्धा होतात. आता हिच क्रेझ युरोपमध्ये पोहचली आहे.
 
इंग्लंमध्येही अशीच आंतरराष्ट्रीय खेळाडूंची स्पर्धा सुरू असून त्यामध्ये विश्वजित ठाकूर खेळत आहे. वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज म्हणून विश्वजितची ख्याती आहे. भारतीय संघातील तो सर्वात युवा खेळाडू आहे. 

टेनिस क्रिकेटमध्ये एवढा लौकीक होईल, असे वाटले नव्हते. भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा खूप आनंद आहे. देशासाठी उत्तम कामगिरी करून यश मिळविण्याचा प्रयत्न असणार आहे. 
- विश्‍वजीत ठाकूर, क्रिकेटपटू 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbaikar tennis cricketer playing in England