मुंबईकरांना चार महिने पुरेल इतके पाणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई - मुंबईकरांना यंदा पिण्याच्या पाण्याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. सातही तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तो चार महिने पुरेल, अशी माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली.

मुंबई - मुंबईकरांना यंदा पिण्याच्या पाण्याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. सातही तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तो चार महिने पुरेल, अशी माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली.

मुंबईला मोडकसागर, तानसा, विहार, तुळसी, भातसा आणि मध्यवैतरणा या तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. त्याचे रोजचे प्रमाण 3750 दशलक्ष लिटर इतके आहे. रणरणत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन जलाशयांमधील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे यंदा पाणीटंचाईशी सामना करायला लागेल की काय, अशी चिंता मुंबईकरांना होती; मात्र यंदा चिंता करण्याचे कारण नाही. चार महिने पुरेल इतका पाणीसाठा तलावांमध्ये असल्याचे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तलावांतील पाण्याची पातळी वाढली आहे. सर्व तलावांमध्ये सुमारे 4 लाख 95 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. हे पाणी 132 दिवस म्हणजेच चार महिने पुरू शकेल. 

Web Title: Mumbaikars get enough water for four months