मुंबई ः मुंबईत हवामान अत्यंत खराब असलेले दिवस दोन वर्षांच्या तुलनेत २०१९ मध्ये वाढले. त्याचबरोबर हवा चांगली असल्याचे दिवसही वाढले, असे ‘सफर’ने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
महत्वाचं - मुंबईचे मरिना शहर होणार वाचा काय आहे बातमी
‘सफर’तर्फे (सिस्टम ऑफ एअर क्वॉलिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमधील हवेच्या दर्जावर लक्ष ठेवले जाते. या वर्षातील प्रदूषणाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीवरून हवामानाच्या दृष्टीने खराब दिवस आणि ‘अच्छे दिन’ वाढल्याचे समोर आले आहे.
मुंबईत २०१९ मध्ये २३ दिवस (सर्व जानेवारीत) वायुप्रदूषणाची पातळी अत्यंत खराब (व्हेरी पुअर) होती. त्या वेळी प्रदूषणाचे मानक (एअर क्वॉलिटी इंडेक्स) ३०१ ते ४०० होते. मुंबईतील हवेची पातळी १७ दिवशी अत्यंत खराब राहिल्याची नोंद २०१७ मध्ये झाली होती; मात्र २०१८ मध्ये केवळ दिवाळीतील चार दिवस प्रदूषणाची पातळी घसरली होती. त्या तुलनेत २०१९ मध्ये अत्यंत खराब हवा असलेले दिवस वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती.
‘अच्छे दिन’ वाढले
मुंबईत चांगली हवा असलेल्या दिवसांतही २०१९ मध्ये वाढ झाली. हवेच्या दर्जाचा निर्देशांक ५० च्या खाली असलेले दिवस चांगले मानले जातात. मुंबईत २०१७ मध्ये ८० आणि २०१८ मध्ये १०२ ‘अच्छे दिन’ होते. चांगल्या दिवसांची संख्या २०१९ मध्ये १३२ वर गेली. वर्षभरातील चांगल्या दिवसांचे प्रमाण मागील तीन वर्षांत अनुक्रमे २२ टक्के, २८ टक्के व ३६ टक्के होते. त्याखेरीज २०१९ मध्ये वायुप्रदूषणाच्या संदर्भात मुंबईतील ९० दिवस समाधानकारक (निर्देशांक ५१ ते १००), ८२ दिवस मध्यम (निर्देशांक १०१ ते २००) आणि ३६ दिवस खराब (निर्देशांक २०१ ते ३००) होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.