संप, मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांची कोंडी !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या सहा दिवसांपासून बस सेवा बंद राहिल्याने आणि रविवारच्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांची कोंडी झाली. संपाबाबत रविवारी कोणत्याही वाटाघाटी झाल्या नाहीत. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल उद्या (ता. १४) उच्च न्यायालयात सादर होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. 

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत समाधानकारक चर्चा न करता, संप बेकायदा ठरवून ‘मेस्मा’ कायद्यांतर्गत निवासस्थानेही रिकामी करण्याच्या कारवाईला सुरवात झाल्यानंतर बेस्टचा संप चिघळला. त्यानंतर महाव्यवस्थापक, पालिका आयुक्त, महापौर, राज्याचे मुख्य सचिव आणि उच्च न्यायालयाने नियुक्ती केलेली उच्चस्तरीय समिती यांच्यासोबत कामगारांच्या कृती समितीची अनेक वेळा चर्चा झाली; मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मध्यस्थीचा प्रयत्न केला. 

Web Title: Mumbaikars stamped due to mega block and Strike