मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्या रविवारी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना मेगाब्लॉकमुळे प्रचंड हाल झाले आहेत. रविवारच्या वेळापत्रकानुसार निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला.