बंदमळे 32 विमाने रद्द 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई - महाराष्ट्र बंदचा फटका बुधवारी मुंबईत विमान सेवेवरही झाला. बंदमुळे दिवसभरात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारी 16; तर आगमन करणारी 16 विमाने रद्द करण्यात आली. 

रस्ते वाहतूक विस्कळित असल्याने अनेक वैमानिकांना विमानतळावर पोचण्यास विलंब झाला. त्यामुळे या विमानतळावरून उड्डाण करणारी 16 विमाने रद्द करण्यात आली. रद्द झालेली बहुतेक उड्डाणे "जेट एअरवेज'ची होती. 

दरम्यान, रस्ते वाहतूक विस्कळित असल्याने विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांसाठी विमानतळ ते जवळच्या स्थानकापर्यंत पोचण्यासाठी टर्मिनस 1 व 2 वरून "बेस्ट'च्या बसची व्यवस्था केली होती. त्यापैकी काही बसवर अंधेरी परिसरात दगडफेक करण्यात आली. त्यामुळे त्या तेथेच थांबवण्यात आल्या. ही माहिती मिळाल्यानंतर अनेक प्रवाशांनी विमानतळाच्या इमारतीतच थांबणे पसंत केले. त्या प्रवाशांसाठी विमानतळ प्राधिकरणाने चहा, नाश्‍ता, पाण्याची व्यवस्था केली होती. 

Web Title: mumbain news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash 32 flights canceled