esakal | महापालिका आयुक्तांनी मुंबईकरांना दिली एक चांगली बातमी

बोलून बातमी शोधा

इक्बाल चहल

मुंबईकरांनी करुन दाखवलं.

महापालिका आयुक्तांनी मुंबईकरांना दिली एक चांगली माहिती
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत परिस्थिती आता हळूहळू पर्वपदावर येतेय. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट आता कमी होत आहे. मुंबईत कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण आता १० टक्क्यांच्या खाली आले आहे. मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली. गुरुवारी मुंबईत कोविड पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ९.९४ टक्के होते. गुरुवारी एकूण ४,३२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एकूण ४३ हजार ५२५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती.

हेही वाचा: मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनाने निधन

"जवळपास ४४ हजार चाचण्या केल्यानंतर आज आमचा पॉझिटिव्हिटी रेट एक आकडी आहे. देशात मुंबई असे एकमेव शहर आहे, जिथे सर्वाधिक चाचण्यांसह पॉझिटिव्हिटी रेट एकआकडी आहे" असा दावा चहल यांनी केला. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट २०.८५ टक्के होता. चार एप्रिलला हा पॉझिटिव्हिटी रेट २७.९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्यादिवशी ५१ हजार ३१३ नमुन्यांच्या चाचण्यांपैकी ११ हजार ५७३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

हेही वाचा: कोरोनाग्रस्त रोहित सरदानांचे हार्टअटॅकने निधन

मुंबईतील ८५ टक्के नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नसल्याचे चहल यांनी सांगितले. कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेड्सच्या संख्येबद्दल माहिती देताना सांगितले की, सध्या ५,७२५ बेड्स रिकामे आहेत. मुंबईत रुग्ण संख्या कमी असली, तरी महाराष्ट्राच्या अन्य भागात मात्र कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झालेले नाही. आता जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल, असे बोलले जात आहे.