दुःखद बातमी : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचं निधन

सुमित बागुल
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येतेय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचं निधन झालंय.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येतेय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय अशी माहिती समोर येतेय. आज सकाळी किशोरी पेडणेकर यांचे बंधू सुनील कदम यांना देवाज्ञा झाली.

सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुनील कदम यांच्यावर मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू होते. गेल्या आठवड्याभरापासून सुनील कदम हे नायर रुग्णालयातच होते. स्वतः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवरून बंधू सुनील कदम यांच्या मृत्यूची माहिती दिलीये. ट्विटरवरून शोक व्यक्त करताना भाऊ सुनील कदम यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना त्यांनी केलीये. 

हेही वाचा नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एक अत्याधुनिक मास्क; जो केवळ कोरोनाला रोखणार नाही तर मारेलही
 

स्वतः महापौर किशोरी पेडणेकरही होत्या होम क्वारंटाईन : 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मुंबईत ग्राउंड झिरोवर जाऊन कोरोना युद्धात काम करतायत. एप्रिलमध्ये अनेक पत्रकारांच्या कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या. त्यापैकी काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाली होती. किशोरी पेडणेकर कोविड पॉझिटिव्ह पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या. यानंतर किशोरी पेडणेकर यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केलं होतं. किशोरी पेडणेकरांनी स्वतःला १४ दिवस होम क्वारंटाईन केलं होतं.   

महत्त्वाची बातमी - मनसेच्या 'बड्या' नेत्याला तडीपारीची नोटीस; एकनाथ शिंदेंनी सूडबुद्धीने केली कारवाई, मनसेचा आरोप

मुंबई कोरोना आकडा हजाराच्या वरच 

मुंबईत काल पुन्हा कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्या एक हजारच्या वर गेलेली पाहायला मिळाली. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,14,287 झाली आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 76 दिवसांवर गेला आहे. 30 जुलैपर्यंत मुंबईत एकूण 5,26,982  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  24 जुलै ते 30 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.92 इतका आहे. मुबंईत कोरोनाची संख्या काही प्रमाणात कमी जरी होत असली तरीही मुंबईत कोरोनाच्या मृत्यूचं प्रमाण कमी करणं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. 

mumbais mayor kishori pednekar lost his brother due to covid 19


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbais mayor kishori pednekar lost his brother due to covid 19