esakal | मनसेच्या 'बड्या' नेत्याला तडीपारीची नोटीस; एकनाथ शिंदेंनी सूडबुद्धीने केली कारवाई, मनसेचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेच्या 'बड्या' नेत्याला तडीपारीची नोटीस; एकनाथ शिंदेंनी सूडबुद्धीने केली कारवाई, मनसेचा आरोप

मनसे नेत्यावर पोलिसांचे जाळे, अविनाश जाधव ताब्यात; कार्यकर्ते संतप्त

मनसेच्या 'बड्या' नेत्याला तडीपारीची नोटीस; एकनाथ शिंदेंनी सूडबुद्धीने केली कारवाई, मनसेचा आरोप

sakal_logo
By
दीपक शेलार

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाणे आणि पालघरमध्ये तब्बल 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याने विरारच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना बागडे यांनी त्यांना तडीपाररीची नोटीस बजावली आहे. त्यानंतर ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या जाधव यांना ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर नौपाडा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.  या कारवाईमुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले असून याचे पडसाद राजकिय वर्तुळातही उमटण्याची चिन्हे आहेत.

मोठी बातमी - नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एक अत्याधुनिक मास्क; जो केवळ कोरोनाला रोखणार नाही तर मारेलही

वसई-विरार पालिका आयुक्तांच्या दालनात शिरून जाधव यांनी उग्र आंदोलन केले होते. याप्रकरणी त्यांच्यासह मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. या पाश्र्वभूमीवर, वसई-विरार उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना बागडे यांनी जाधव यांच्यावर दाखल असलेल्या 17 न्यायप्रविष्ठ आणि 3 तपास सुरू असलेल्या गुन्ह्यांची जंत्री मांडून पालघर जिल्ह्यालगतचे ठाणे, ठाणे ग्रामीण, नवीमुंबई, बृहन्मुंबई आणि रायगड या भागासाठी तडीपारीची नोटीस बजावली.

कोणत्याही दडपशाहीला जुमानणार नाही : - 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघर्ष करणारी संघटना आहे. सरकारच्या कोणत्याही दडपशाहीला  जुमानणार नाही. आमचे सर्व कार्यकर्ते नागरिकांवरील अन्यायाविरोधात लढा देतच राहतील.  त्यासाठी रस्त्यावरील लढाई लढण्यास महाराष्ट्र सैनिक तयार आहेत. - संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

मोठी बातमी - संशोधनातून समोर आली नवीन माहिती, 6 फूट उंच व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक

दरम्यान, ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिका आणि इतर कर्मचार्यांना सहा महिन्यांच्या करारावर घेतले असताना अचानक नोटीस देऊन 31 जुलैपासून कामावर येऊ नये, असे आदेश पालिकेच्यावतीने देण्यात आल्याने, या परिचरिकांना घेऊन शुक्रवारी  जाधव यांनी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन छेडले. तसेच, ठाणे महापालिका ठेकेदार चालवतात, असा गंभीर आरोप केला. त्यानंतर, काही वेळातच ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने जाधव यांना ताब्यात घेत चार तास चौकशीसाठी थांबवुन ठेवले. त्यामुळे, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.

मोठी बातमी -  भीषण ! कोविड नसलेल्या रुग्णांवर पॉझिटिव्ह म्हणून केले उपचार, अखेर जीव गेला आणि...

जाधव यांच्यावरील अन्याय कारवाई अन्यायकारक असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याने आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका, असा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला.

( संपादन - सुमित बागुल )

mns leader avinash jadhav gets notice of deportation praty blames minister eknath shinde for this


 

loading image