पाणी बिल भरताय... या योजनेतून मिळेल विशेष सूट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

थकीत पाणीबिले भरण्यासाठी पालिकेची अभय योजना

मुंबई : पाणी देयकातील थकीत अतिरिक्त रकमेतून सूट देण्यासाठी पालिकेने अभय योजना २०२० सुरू केली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जलजोडणीधारकांना ही थकीत रक्कम एकरकमी भरावी लागणार आहे. १५ मे २०२० पर्यंत ही योजना राबवणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आणि सुप्रियाच्या माहेरीच पती पत्नीमध्ये सुरु झालं धाब.. धूब.. धाब.. धूब..

मुंबईतील काही चाळी, झोपड्या, तसेच नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या एसआरए योजनेतल्या इमारतीतील रहिवाशांचे पाणीबिल थकीत आहे. हे थकीत बिल न भरल्याने देयकाची रक्कमही वाढत जाते. त्यामुळे ग्राहकांना ही रक्कम भरता यावी, तसेच अतिरिक्त थकीत पाणीबिलातून त्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने अभय योजना सुरू करण्यात आली आहे. 

घेणं ना देणं..! नागरिकांना बसतोय तीन हजारांचा भुर्दंड...   

या योजनेत थकीत पाणीबिलातील जलआकार, मलनिःसारण आकार आणि जलमापक भाडे एकरकमी भरणे आवश्‍यक आहे. जास्तीत-जास्त रहिवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Municipal Abhay Scheme for payment of outstanding water bills


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Abhay Scheme for payment of outstanding water bills