esakal | आणि सुप्रियाच्या माहेरीच पती पत्नीमध्ये सुरु झालं धाब.. धूब.. धाब.. धूब..
sakal

बोलून बातमी शोधा

आणि सुप्रियाच्या माहेरीच पती पत्नीमध्ये सुरु झालं धाब.. धूब.. धाब.. धूब..

आणि सुप्रियाच्या माहेरीच पती पत्नीमध्ये सुरु झालं धाब.. धूब.. धाब.. धूब..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : WWF आपण सगळ्यांनीच टीव्हीवर बघितलं आहे. यात बेदम मारहाण करण्यात येते. असाच काहीसा प्रकार मुंबईच्या वसईत घडला आहे. वसईतल्या नागरिकांनी काल चक्क WWF चा थरार अनुभवला. दोन कुटुंबांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचा प्रकार वसईत घडला आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हीडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वसई पश्चिमेकडे ‘डीमार्ट’जवळ असलेल्या पेरियार सोसायटीत सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. भरवस्तीत घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मोठी बातमी - घेणं ना देणं..! नागरिकांना बसतोय तीन हजारांचा भुर्दंड...

नक्की काय घडलं?

सुप्रिया जैस्वाल आणि त्यांचे पती यांच्यात वाद झाल्यामुळे सुप्रिया या आपल्या माहेरी आल्या होत्या. सासरच्यांसोबत आणि पतीसोबत पटत नसल्यामुळे त्या आई वडिलांकडे राहत होत्या. सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सुप्रिया यांचे पती आणि त्यांच्या सासरची मंडळी सुप्रिया यांच्या वडिलांच्या घरी आले. यावेळी चर्चा करत असताना या दोन्ही कुटुंबामध्ये मोठं भांडण झालं.

काही क्षणातच या दोन्ही कुटुंबात बेदम मारहाण सुरू झाली. सासरच्या लोकांकडून सुप्रिया यांच्या भावांना मारहाण करण्यात आली.  त्यानंतर सुप्रिया यांनी पतीवर मारहाण केल्याचा आरोप केलाय. दरम्यान यात सुप्रिया यांचे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर वसईच्या गोल्डनपार्क हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

मोठी बातमी -  'पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा दिला राजीनामा'; भाजपला मोठा शॉक...

दरम्यान या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सिसिटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.      

free style fight between husband and wife captured on cctv at vasai


 

loading image
go to top