esakal | बदलापूरमध्ये फलक, बॅनरवर नगरपालिकेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बदलापूरमध्ये फलक, बॅनरवर नगरपालिकेची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबरनाथ : बदलापूर (Badlapur) शहरातील कर्जत (Karjat) महामार्गावरील हॉटेल(Hotel), ढाबे (Dhaba), आस्थापना आणि दुकानांच्या, रस्त्यांवरील बेकायदा लटकणाऱ्या फलक (Board) आणि बॅनरवर (Banner) बदलापूर (Badlapur) नगरपालिका (Municipal) प्रशासनाने आज कारवाई केली.

फलक उभारताना पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता शहराचे विद्रूपीकरण करत असल्याचे सांगत लोखंडी फलक, मोठमोठे बॅनर पालिकेने तोडले. या वेळी अनेक दुकानदारांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र पालिकेने बेकायदा फलक, बॅनरवर कारवाई सुरू ठेवली. बदलापूर पूर्व भागातील डी-मार्टपासून खरवई नाक्यापर्यंत महामार्गावर विविध आस्थापना, दुकाने, हॉटेल, ढाबे, उपाहारगृहे आणि दुकाने यांच्याबाहेर फलक लावण्यात आले होते. गृहसंकुलांचे जाहिरात फलक, बॅनर यांचाही यात समावेश होता.

त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले होते. त्यावर नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. आज बदलापूर नगरपालिका प्रशासनाने सहायक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली.

हेही वाचा: अनधिकृतपणे पाणीवाटपाचा व्यवसाय

  • परवानगी पत्र सादर करा

अनधिकृतपणे उभारलेल्या फलकांवर कारवाई सुरू असून रीतसर परवानगी घेतली असेल तर कारवाई होण्यापूर्वी परवानगी पत्र सादर करा, असे आवाहन सहायक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांनी कामात अडथळा आणणाऱ्यांना केले.

loading image
go to top