अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेने २७ गावांतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असतानाच आजदे येथील एमआयडीसीच्या भूखंडावर उभ्या असलेल्या दोन अनधिकृत इमारतींवर सोमवारी (ता. १०) कारवाई केली आहे. कार्यकारी अभियंता संजीव ननावरे आणि इतर अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली. जयवंत करणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एमआयडीसीच्या मोकळ्या जागेवर दोन अनधिकृत टॉवर बांधण्यात येत असल्याची तक्रार  केली होती. त्याची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने दोन्ही इमारती जमीनदोस्त करून तसा अहवाल देण्याचे आदेश एमआयडीसीला दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई झाली. 

Web Title: municipal action on the unauthorized construction