
मुंबई : अनंत चतुर्दशीदिनी (ता.६) होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने संपूर्ण तयारी केली असून गणरायाला निरोप देण्यासाठी विविध सोयी-सुविधांसह प्रशासन सज्ज आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी महानगरपालिकेचे जवळपास १० हजार अधिकारी - कर्मचारी, २४५ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत.