
Mumbai environmental update
esakal
मुंबई : पावसाळ्यामुळे थांबलेली मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाची कामे आता पुन्हा सुरू होत आहेत. गेल्या चार महिन्यांच्या खंडानंतर पालिकेकडून शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रस्ते सिमेंटीकरणाचा वेग वाढविण्यात येणार आहे. प्राथमिक टप्प्यात बॅरिकेडिंग, माहिती फलक लावणे, वाहतूक विभागाकडून परवानग्या घेणे अशी कामे सुरू झाली असून, पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.