

मुंबई : राज्यभरात रविवार (ता. ३१ ऑगस्ट) रोजी पाच दिवसांच्या गणेशमुर्तीचे विसर्जन पार पडले. यंदा प्रशासनाने सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्त्रोतात करण्यास सांगितले आहे. याबाबत प्रदूषण नियामक मंडळाने परवानगी दिली असल्याचा दावा गणेशोत्सव समितीने केला आहे. मुंबईत गणेशोत्सवातील पाचव्या दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले असून एकूण ३६ हजाराहून अधिक मूर्तींचे विसर्जन झाले आहे अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.