
Mumbai Bridge
ESakal
मुंबई : मुंबईतील २१ पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय पूल पडल्यानंतर घेण्यात आला होता, मात्र पुलांच्या पुनर्बांधणीचे आणि दुरुस्तीचे पालिकेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. पुलांची कामे संथ गतीने सुरू आहेत. ४७ पुलांची मोठी दुरुस्ती आणि १४४ पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्यात दिरंगाई होत असल्याने धोकादायक पुलांबाबत नागरिकांना चिंता वाटत आहे.