महापालिका समित्यांच्या निवडणुका एप्रिलमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई - महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. महापालिकेच्या अधिनियमानुसार या निवडणुका नियमित प्रक्रिया असल्याने लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा परिणाम होणार नाही. त्यामुळे या निवडणुका ठरल्यानुसार एप्रिलमध्ये घेतल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

महापालिकेच्या कामकाजात वैधानिक आणि विशेष समित्यांना महत्त्व आहे. स्थानिक पातळीवरील कामकाज प्रभाग समित्यांच्या माध्यमातून चालवले जाते. महापालिकेची २४ प्रभाग कार्यालये असून, १७ प्रभाग समित्या आहेत. जास्त नगरसेवक असलेल्या राजकीय पक्षाला समितीचे अध्यक्षपद मिळते. या वेळी भाजपसोबत युती नसल्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. जवळपास शिवसेनेइतकेच संख्याबळ असतानाही भाजपने प्रभाग समित्या वगळता अन्य कोणत्याही समितीवर दावा न करता पहारेकऱ्याची भूमिका घेतली. त्यामुळे सर्व वैधानिक समित्यांवर शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. आता लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती झाल्यामुळे भाजप वैधानिक समित्यांवर दावा करण्याची शक्‍यता आहे. 

सध्या १७ पैकी ९ प्रभाग समित्या भाजप आणि अखिल भारतीय सेनेकडे असून, उर्वरित समित्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. विशेष समित्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची पदे शिवसेनेकडेच आहेत.

Web Title: Municipal Committee Election in April