

Duplicate Voters
ESakal
मुंबई : राज्यभरातील महानगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. उद्या म्हणजेच १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर हणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन नुकतेच नगरपरिषदांच्या मतदानाच्या निकालाच्या तारखांची घोषणा केली आहे. मात्र या निवडणुकांमध्ये दुबार मतदारावरून विरोधकांनी आक्षेप घेतला असून या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.