
मुंबई : महापालिका क्षेत्रात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ पूल धोकादायक स्वरूपाचे आहेत. काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तर काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांनी श्रीगणेशाचे आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकांदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. याबाबत महापालिका व मुंबई पोलिस यांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.