

Panvel Traffic
ESakal
नवीन पनवेल : नवीन पनवेलमधील एचडीएफसी सर्कल परिसरात महापालिकेच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली असून, ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. दिवसभर वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम राहात असून, याचा ताण थेट वाहतूक पोलिसांवर येत आहे.