Mumbai High court
Esakal
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यावरील कुठेही, कशाही पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. ३१) गंभीर चिंता व्यक्त केली. रस्त्यावरील कचऱ्याचे साम्म्राज्य पाहता 'स्वच्छ मुंबई, हरित मुंबई' या महापालिकेच्या घोषणेचे पालन होते का, असा प्रश्न उपस्थित करून ती निव्वळ कागदावरच राहिल्याचे ताशेरेही न्यायालयाने पालिकेवर ओढले. तसेच मुंबईतील वारसा स्थळांजवळील कचरा सात दिवसांत हटविण्याचे आदेश महापालिकेला दिले. अन्यथा, संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कठोर कारवाई करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला.