
मुंबई : महापालिकेने सार्वजनिक गणेश मंडळांना प्रत्येक खड्ड्यासाठी तब्बल १५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय उत्सवावर अन्याय करणारा आणि आर्थिक बोजा वाढवणारा असल्याने तो तात्काळ रद्द करावा, अशी जोरदार मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत सर्व गणेश मंडळांनी केली अशी माहिती समितीचे अध्यक्ष ॲड नरेश दहिबावकर यांनी केली आहे.